Pig Farming : भारतात शेतीचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय देखील केला जातोय. अनेक शेतकरी बांधव शेतीशी निगडित व्यवसाय करून अतिरिक्त कमाई करत आहेत. शेतीशी निगडित व्यवसायात म्हैस पालन, गाय पालन, बकरी पालन, मेंढी पालन अशा विविध व्यवसायांचा समावेश होतो.
विशेष म्हणजे या शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. वराह पालन हा देखील एक शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र हा व्यवसाय खूपच कमी शेतकरी करतात. यामुळे या व्यवसायातून मिळणारी कमाई इतर पशुपालनाच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा केला जातो.
बाजारात वराहाच्या मांसाची मोठी मागणी असते. तथापि, ही मागणी कमी उत्पादनामुळे पूर्ण होत नाही. यामुळे बाजारात वराहाचे मांस आधीच्या तुलनेत अधिक बाजारभावात विकले जात आहे. परिणामी हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले आहे.
नाशिक मधील एका सुशिक्षित महिला शेतकऱ्याने वराह पालन व्यवसायातून वार्षिक 30 ते 40 लाख रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. अशा परिस्थितीत आज आपण वराह पालन व्यवसायातील काही फायदे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहूमूल्य माहिती विषयी सविस्तर.
वराह पालणाचे फायदे काय आहेत ?
डुकरांची वाढ इतर प्राण्यांपेक्षा वेगाने होते.
डुक्कर धान्य, खराब झालेले अन्न, चारा, फळे, भाज्या, कचरा, ऊस इत्यादींसह जवळजवळ सर्व प्रकारचे अन्न खाऊ शकतात. कधीकधी ते गवत आणि इतर हिरव्या वनस्पती किंवा मुळे देखील खातात. यामुळे डुकरांसाठी आवश्यक असलेल्या फीडवर कमी खर्च करावा लागतो.
डुक्कर इतर प्राण्यांपेक्षा लवकर वाढतात. मादी डुक्कर 8-9 महिन्यांचे झाले की पिलांना जन्म देण्यास सक्षम बनते. डुक्कर वर्षातून दोनदा पिलांना जन्म देऊ शकतात आणि प्रत्येक वेताला 8-12 पिलांना जन्म देतात.
वराह पालन व्यवसायासाठी आवश्यक असलेले शेड उभारण्यासाठी कमी खर्च लागतो.
डुकराचे मांस हे सर्वात पौष्टिक आणि स्वादिष्ट मांस आहे. त्यात जास्त चरबी आणि ऊर्जा असते आणि पाणी कमी असते.
डुक्करापासून मिळणारे खत हे एक चांगले आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे खत आहे. तुम्ही ते शेतात पीक उत्पादनासाठी आणि तलावातील मत्स्यपालन या दोन्हीसाठी वापरू शकता. यामुळे डुकरांच्या खताला देखील बाजारात मागणी असते.
पोल्ट्री फीड, पेंट, साबण आणि रासायनिक उद्योगांमध्ये डुकराच्या चरबीला मोठी मागणी असते.
डुक्कर 7-9 महिन्यांच्या वयात मांसासाठी योग्य होतात. या कालावधीत त्यांचे विक्रीयोग्य वजन 70-100 किलोपर्यंत पोहोचते.
भारतीय बाजारात डुकराच्या मांसाला मोठी मागणी आहे.
डुक्कराचे वजन दररोज 500 ते 600 ग्रॅमने वाढते. इतर जनावरांमध्ये मात्र एवढ्या जलद गतीने वजन वाढत नाही.
डुकरांना जवळपास कोणतेच आजार होत नाहीत. कोणत्याही वातावरणात डुक्कर सहज वाढते.
या उद्योगात, पिले, गिल्ट (तरुण डुक्कर), दूध देणारे डुक्कर, नर डुक्कर आणि कुडली डुकर (मांसासाठी) चांगल्या किमतीत विकले जाऊ शकते.
या व्यवसायातुन 30-50 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.