Petrol And Diesel Price : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार अशी शक्यता आहे. लवकरच भारतीय निवडणूक आयोग राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. पुढील महिन्यात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तारखा जाहीर होऊ शकतात असा एक अंदाज आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तसेच महायुती मधील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सी एल एस ए या ब्रोकरेज फर्मने हा अंदाज दिला आहे.
या संस्थेने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 ऑक्टोबर नंतर कमी होतील असे म्हटले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जेव्हा केव्हा निवडणुकीची घोषणा होत असते तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतात. लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील असेच घडले होते.
मार्च 2024 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय सचिव पंकज जैन यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आगामी काळात कमी होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना आता पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
कारण की, सी एल एस ए या ब्रोकरेज फर्म ने पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे. असे झाल्यास नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलर 19.8 रुपये आणि डिझेलवर 15.8 रुपये उत्पादन शुल्क लावले आहे. पण, 2021 मध्ये लागू असणाऱ्या उत्पादन शुल्काशी तुलना केली असता सध्याचे उत्पादन शुल्क हे जवळपास निम्म्याने कमी आहे.
दरम्यान आता केंद्रातील सरकार सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याच्या विचारात आहे आणि दुसरीकडे सरकारचे महसूल वाढावे यासाठी पेट्रोल आणि डिझेल साठी लागू असणारे उत्पादन शुल्क वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.