Petrol And Diesel Price : ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात आनंदाचा माहोल राहणार आहे. कारण की एकाच महिन्यात नवरात्र उत्सव, विजयादशमी आणि दिवाळी हे मोठे सण साजरे केले जाणार आहेत. उत्तर भारतातील सर्वात मोठा सण अर्थातच छटपूजाचा सण देखील याच महिन्यात येत आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान यंदाची दसरा आणि दिवाळी विशेष खास ठरणार आहे, यावेळी दसरा आणि दिवाळीला तुमचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण की या सणांच्या आधीचं सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी तेल कंपन्यांनी केली असून आता फक्त सरकारच्या संकेताचीच प्रतीक्षा उरली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सरकार हिरवा कंदील दाखवेल, असे मानले जात आहे.
सौदी अरेबियासारख्या जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांकडून पुरवठा वाढल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 24 ते 33 टक्क्यांनी खाली आल्या आहेत.
त्यामुळे कंपन्यांची तेल खरेदीतही मोठी बचत होत आहे. ब्रेंट क्रूड देखील प्रति बॅरल सुमारे $72 पर्यंत खाली आले आहे, त्याचा फायदा सर्वसामान्यांना देण्याची तयारी आता सुरू झाली आहे.
तेल कंपन्यांनी किमती कमी करण्याची पूर्ण तयारी केली आहे, ते फक्त सरकारच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहेत असे काही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलण्याचे स्वातंत्र्य असले तरी ते राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याने कंपन्याही सरकारच्या संकेताची वाट पाहत असतात. त्यामुळेच या वेळीही कंपन्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे सरकारकडे पाठवली असून आता मंजुरीची प्रतीक्षा आहे.
यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर तीन रुपयांनी कमी होऊ शकतात, असा एक अंदाज समोर आला आहे. असे झाल्यास महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे.
सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे केंद्राच्या या निर्णयाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळू शकतो असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.