Pension Scheme : केंद्र आणि राज्य शासनाकडून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा समाजातील वंचित आणि शोषित घटकांना समान हक्क देण्याचा प्रयत्न असतो.
दिव्यांग व्यक्तींना देखील समान अधिकार मिळावेत यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. या लोकांसाठी पेन्शनची देखील योजना सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय वृद्धापकाळ अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दरमहा किमान पेन्शन उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्यातून लाभार्थ्यांना दिले जात आहे.
दिव्यांगाव्यतिरिक्त या योजनेचा पाच घटकांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत संबंधित पात्र व्यक्तींना 1500 रुपये प्रति महिना एवढे पेन्शन दिले जात आहे.
दरम्यान, आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो, यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावे लागतात याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अर्ज कोठे करावा लागतो
या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करता येतो. वास्तविक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
मात्र अनेकांना ऑनलाइन अर्ज करता येत नसल्याने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा महापालिकेत अर्ज सादर करता येतो.
कोण कोणती कागदपत्रे लागतात
इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्याप्रमाणे काही महत्त्वाची कागदपत्रांची डिमांड केली जाते तशीच काहीशी डिमांड या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील करण्यात आली आहे.
किती टक्के अपंगत्व आले आहे याबाबतचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो, इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे या योजनेच्या लाभासाठी सादर करावी लागतात.
ही कागदपत्रे आणि योजनेचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा महापालिकेत सादर केल्यानंतर पात्र लोकांना शासनाच्या या योजनेतून पेन्शन उपलब्ध होते. जे लोक पात्र ठरतात त्यांना दरमहा १५०० रुपये एवढी पेन्शन दिली जाते.