Pearl Farming : मित्रांनो भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल बघायला मिळत आहे. अलीकडच्या काळात शेतकरी बांधव (Farmer) नवीन नगदी पिकांच्या (Cash Crop) लागवडीकडे वळत आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील पीकपद्धतीत मोठा बदल करत आहेत.
शिवाय आता शेतकरी बांधव शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) देखील करू लागले आहेत. शेतकरी बांधवांनी आता पारंपारिक शेतीपद्धतीला बगल दिली असून आधुनिक शेतीकडे (Modern Farming) शेतकरी बांधव वळला आहे. त्यामुळे त्यांना भरपूर लाभ मिळत असून त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.
या काळात मोत्याची शेतीही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे पर्ल फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बक्कळ कमाई होत आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील आता मोठ्या प्रमाणात पर्ल फार्मिंग करत असल्याचे चित्र आहे.
कमी गुंतवणूकित जास्त नफा मिळतो बर
जाणकार लोकांच्या मते, मोत्यांच्या शेतीसाठी फारसा पैसा लागत नाही. तज्ज्ञांच्या मते, हा व्यवसाय केवळ 25 हजारांच्या गुंतवणुकीत शेतकरी 3 लाखांपर्यंत बंपर नफा मिळवू शकतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक प्रकारचे महागडे दागिने मोत्यांपासून बनवले जातात. जे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यावधीत विकले जातात.
मोत्याची शेती कशी केली जाते बर
शेतकरी ऑयस्टरच्या म्हणजे जिवंत शिंपल्यांच्या मदतीने मोत्यांची निर्मिती करू शकतात. त्यासाठी 500 चौरस फुटांचा तलाव किंवा टाकीची आवश्यकता शेतकऱ्यांना भासणार आहे. सर्वप्रथम, वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ऑयस्टर 10 दिवस घरी बनवलेल्या एका छोट्या तलावात सोडले जातात.
शस्त्रक्रियेनंतर, त्यांच्यामध्ये न्यूक्ली टाकले जाते आणि तीन दिवस अँटीबॉडीजमध्ये ठेवले जाते. त्यानंतर सर्व शिंपले 12-13 महिने तलावात सोडले जातात. पर्ल फार्मिंग च्या माध्यमातून तीन पट नफा शेतकऱ्यांना मिळत असल्याचे जाणकार नमूद करतात.
प्रशिक्षण घ्या बर
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावामध्ये सुमारे 100 ऑयस्टरचे संगोपन करूनही तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता. मात्र, असे असले तरी या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आणि या व्यवसायातून चांगली कमाई करण्यासाठी योग्य प्रशिक्षणही आवश्यक आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पर्ल फार्मिंगसाठी अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम चालवले जातात. या प्रशिक्षणांचा लाभ घेऊन शेतकरी पर्ल फार्मिंग व्यवसायातील सर्व बारकावे शिकू शकतात आणि नंतर व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकतात.
किती नफा कमावता येईल बर
सुमारे 500 ऑयस्टरपासून पर्ल फार्मिंग सुरु करण्यासाठी 25 हजारांपर्यंत खर्च येतो. या मोत्यांचा बाजारभाव 250 ते 400 रुपये प्रति मोती आहे. याद्वारे शेतकरी 500 शिंपल्यांपासून सुमारे 1.25 लाख ते तीन लाखांचे उत्पन्न मिळवू शकतात. निश्चितच या व्यवसायातून शेतकरी बांधवांना चांगली कमाई होणार आहे.