Panjabrao Dakh : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर ही बातमी फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर राज्यातील संपूर्ण जनतेसाठी विशेष खास राहणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानाचा पारा खूपच हाय झाला आहे. ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील जनता बेजार झाली आहे.
त्यामुळे आता राज्यातील जनतेच्या माध्यमातून थंडीला केव्हा सुरुवात होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच शेतकरी बांधव परतीचा पाऊस यंदा महाराष्ट्रात अपेक्षित असा बरसलेला नसल्याने हिवाळ्यात यंदा पाऊस पडणार का असा सवाल उपस्थित करत आहेत. दरम्यान या प्रश्नांच उत्तर पंजाबराव डख यांनी दिले आहे. पंजाबरावांनी आपला सुधारित हवामान अंदाज जाहीर केला आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. मात्र राज्यात आता मोठा पाऊस पडणार नाही. स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंजाबरावांनी यावर्षी 26 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यात मात्र 24 ऑक्टोबर पासूनच थंडी पडायला सुरुवात होणार आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात सर्व दूर 26 ऑक्टोबर पासून तीव्र थंडीला सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले आहे. तसेच आता महाराष्ट्रात जवळपास 3 नोव्हेंबर पर्यंत प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
यानंतर मात्र हवामानात थोडासा चेंज होईल आणि नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात राज्यात चांगला पाऊस बरसेल असा अंदाज त्यांनी सांगितला आहे. नोव्हेंबर प्रमाणेच यावर्षी डिसेंबर महिन्यातही पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा नवीन हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.