Panjabrao Dakh Weather Update News : यावर्षी अर्थात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत 2024 मध्ये मान्सून कसा राहणार, यंदा मान्सूनच आगमन केव्हा होणार, खरीप हंगामातील पिकांची पेरणी केव्हा पूर्ण होणार असे अनेक सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
खरे तर गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सूनचं उशीराने आगमन झालं होतं. मान्सूनचं उशिराने आगमन झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता आली नव्हती. परिणामी यंदा मान्सूनच आगमन केव्हा होणार हाच महत्त्वाचा आणि मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
मान्सूनला जून महिन्यात सुरुवात होते, त्यामुळे अजून मान्सून सुरु होण्यास अवकाश आहे. मात्र असे असले तरी जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 2024 मध्ये मान्सून कसा राहणार, मान्सूनच आगमन केव्हा होणार आणि खरीपातील पिकांच्या पेरण्या केव्हा पूर्ण होऊ शकतात याबाबत आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
काय म्हटले पंजाबराव डख
पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात 2024 मध्ये मान्सून काळात समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. यावेळी डख यांनी गेल्या चार ते पाच वर्षाअसून मान्सून 22 दिवस पुढे सरकला असल्याचे म्हटले आहे.
अर्थातच आपल्याकडे जो मान्सून सात जूनला दाखल होत असतो तो मान्सून आता 27 ते 28 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत असतो. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये खरीप हंगामातील पेरण्या देखील पूर्ण होत आहेत.
त्यामुळे यंदा देखील मान्सून याच कालावधीत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी या कार्यक्रमात ज्यावर्षी सात जूनला मिरग म्हणजे मृग नक्षत्र येत असतो तेव्हा मान्सून काळात चांगला पाऊस पडत असतो असे म्हटले आहे.
यंदा देखील अर्थातच 2024 मध्ये देखील सात जूनलाच मिरग म्हणजे मृग नक्षत्र सुरू होणार आहे, त्यामुळे याहीवर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर 10 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये देखील यावर्षी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे जर समजा जून महिन्यात काही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही तर त्यांना जुलै महिन्यातल्या या पावसाचा फायदा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरंतर या कालावधीत पंढरपूर येथील यात्रा असते.
दरवर्षी आषाढी वारीला गेलेले भाविक घरी परततात, तेव्हा हमखास पाऊस पडत असतो. त्यामुळे यंदा देखील आषाढी वारीला भरपूर पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
एकंदरीत, जून महिन्याच्या अखेरीस खरीप पिकांची पेरणी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावर्षी जून ते सप्टेंबर 2024 या काळात चांगला पाऊस पडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.