Panjabrao Dakh : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघा चार दिवसांचा काळ बाकी आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. नवनवीन संकल्प घेऊन आता सर्वजण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रातील हवामानातं पुन्हा एकदा बदल होणार आहे आणि राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढत आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना या वातावरणाचा फायदा होत आहे.
मात्र आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 डिसेंबर ते 2 जानेवारी 2024 दरम्यान राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
म्हणजेच आणखी एक आठवडा महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या कालावधीत राज्यात थंडीचा जोराचा कायम राहू शकतो. पण 2 जानेवारी नंतर राज्यातील हवामानात बदल होणार आहे.
3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 हे पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.
या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
सोबतच या विभागात ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस बरसणार नाही त्या ठिकाणी ढगाळ हवामान राहील असा अंदाज त्यांनी दिला आहे.
निश्चितच हे पावसाळी वातावरण राज्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि फळबागांसाठी थोडेसे घातक ठरू शकते. यामुळे रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि उत्पादनात मोठी घट येईल अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. ए
कंदरीत नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्याने नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून समोर आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत.