Panjabrao Dakh Soybean Variety : येत्या काही दिवसात मान्सून भारताच्या मुख्य भूमी दाखल होणार आहे. यानंतर मानसून आपल्या महाराष्ट्रात येणार आहे. जेष्ठ हवामान अभ्यासकं पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे यंदा मान्सून महाराष्ट्रात आठ ते नऊ जूनला सक्रिय होण्याची शक्यता आहे. अर्थातच येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या मुख्य भूमी दाखल होणार आहे.
त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मान्सून आगमनानंतर राज्यात खरीप हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते.
दरम्यान आज आपण सोयाबीनच्या प्रमुख जातींची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण जेष्ठ हवामान अभ्यासकं पंजाबरावं डख यांनी सांगितलेल्या सोयाबीन जातींची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
KDS 726 : केडिएस 726 अर्थातच फुले संगम या जातीच्या सोयाबीनची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. पंजाब रावांनी देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ MPKV, राहुरी यांनी विकसित केलेल्या KDS 726 अर्थातच फुले संगम या जातीची लागवड करण्याची शिफारस केली आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. या जातीचे पीक 100 ते 105 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून हेक्टरी 23 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा होत आहे.
KDS 753 : सोयाबीनचा हा देखील एक प्रमुख वाण आहे. या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीला फुले किमया या नावाने ओळखले जाते. हा देखील वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केला आहे.
या जातीची राज्यातील बहुतांशी भागांमध्ये लागवड पाहायला मिळते. पंजाबराव डख यांनी देखील या जातीची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
या जातीचे पीक अवघ्या तीन महिन्यात तयार होते. या जातीपासून अवरेज 25 ते 30 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
MAUS 612 : सोयाबीनचा हा एक प्रमुख वाण आहे. सोयाबीनची ही जात वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने विकसित आणि प्रसारित केली आहे. ही जात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
या जातीचे पीक 95 ते 100 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. विशेष म्हणजे या जातीचे पीक हार्वेस्टर मशीनने काढले जाऊ शकते. पंजाबरावांनी यादेखील जातीची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.