Panjabrao Dakh September Weather Update : यंदाचा मान्सूनचा अंतिम टप्पा आता सुरु झाला आहे. येत्या महिन्याभरात मान्सून देशातील अनेक भागातून माघारी फिरणार आहे. येत्या काही दिवसात राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. राज्यात पाच ऑक्टोबर किंवा 8 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
आत्तापर्यंत मान्सूनचा तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र या तीन महिन्याच्या काळात महाराष्ट्रात काही बोटावर मोजण्याइतके दिवस वगळले तर जोरदार पाऊस बरसलेलाच नाही. जुलै महिन्यात फक्त महाराष्ट्रात चांगला पाऊस पडला होता जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी देखील गाठली नाही.
मात्र पावसाने या मान्सून काळात एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो म्हणजे गेल्या 122 वर्षात ऑगस्ट महिन्यात जेवढा पावसाचा खंड पडला नव्हता तेवढा खंड 2023 च्या मान्सून मधील ऑगस्ट महिन्यात पडला आहे. हा विक्रम मात्र शेतकऱ्यांना मरणयातना देणारा ठरत आहे. सध्या पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले खरीप पीक जळून खाक होण्याच्या वाटेवर आहे.
काही ठिकाणी तर खरिपातील पिके करपली देखील आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक आर्थिक भ्रूदंड बसणार आहे. दरम्यान जर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रात दुष्काळ पडणार हे जाहीर आहे. यामुळे आता पावसासाठी बळीराजा देवाकडे विनवणी करत आहे. तज्ञांनी येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही तर आगामी काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची भीती बोलून दाखवली आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात कधी नव्हे ते मोठे पाणी संकट उभे राहिले आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 2 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे.
2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच 5 सप्टेंबर नंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल आणि सहा सप्टेंबर नंतर विदर्भात पावसाचा जोर वाढेल असेही त्यांनी यावेळी नमूद केल आहे. एवढेच नाही तर राज्यात पाच, सहा, सात सप्टेंबर पासून ते 20-21 सप्टेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस सुरूच राहणार असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
पंजाबरावांसोबतच भारतीय हवामान विभागाने देखील पहिल्या आठवड्याच्या मध्यवर्ती नंतर राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अर्थातच राज्यात चार सप्टेंबर नंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पंजाबराव डख आणि हवामान विभाग यांचा हा नवीन हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.