Panjabrao Dakh Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यावर आलेले अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. अजूनही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज समोर आला आहे.
खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमान थोडेसे कमी होत होते. याचा परिणाम म्हणून राज्यात गारठा वाढू लागला होता. त्यामुळे रब्बी पिकांना याचा फायदा मिळेल असे बोलले जात होते.
गेल्या महिन्यात अर्थातच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आणि या चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे, ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मात्र ज्या ठिकाणी मान्सून काळात पाऊसच बरसला नव्हता त्या ठिकाणी हा अवकाळी पाऊस देखील दिलासा देऊन गेला आहे.
अशातच आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट येणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी आज आणि उद्या अर्थातच 18 आणि 19 डिसेंबर 2023 रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार आणि काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील मध्य महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
राज्यातील सोलापूर, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असेल असा अंदाज दिला आहे.तर सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असे सांगितले जात आहे.
मात्र हा पाऊस सर्व दूर पडणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील काही भागात, अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगितले गेले आहे.
तसेच 20 डिसेंबर 2023 पासून पुन्हा एकदा राज्यात थँडीचा जोर वाढेल असे देखील त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.