Panjabrao Dakh News : हवामान खात्याने राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे. तसेच, त्यापासून पूर्व विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे.
शिवाय, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाबरावांनी उद्यापासून अर्थातच 17 मार्चपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असे म्हटले आहे. त्यांनी 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
एवढेच नाही तर काही ठिकाणी गारपीट होईल असा देखील अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 17 मार्च ते 20 मार्च दरम्यानच्या कालावधीत विदर्भ विभागात अवकाळी पाऊस होणार आहे.
विदर्भ विभागातील पूर्व भागात पश्चिम विदर्भापेक्षा जास्त पाऊस पडेल आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यातच गारपिट होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. दुसरीकडे, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा हवामानाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस
राज्यातील नागपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोट, अचलपूर, अकोला, बुलढाणा, या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यापैकी गडचिरोली, वर्धा, भंडारा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपिट होणार असाही अंदाज आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेच अवकाळी पाऊस किंवा गारपीट होणार नाही असे पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तथापि, राज्यातील खानदेशी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पुण्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानाची शक्यता कायम राहणार आहे.
एवढेच नाही तर अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे विदर्भावर असणारे हे सावट फक्त 20 तारखेपर्यंत राहील. यानंतर मात्र हवामान कोरडे होईल आणि उन्हाचा पारा वाढणार असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. 21 मार्चपासून उन्हाचा पारा 40°c पेक्षा अधिक होईल असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.