Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे मराठवाडा विदर्भासहित देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी परतला आहे. पण अजूनही महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय आहे परंतु येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल असे सांगितले जात आहे. मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याने राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे.
काल-परवा उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची देखील हजेरी लागली आहे. म्हणजेच राज्यात मिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. पण, राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर हिटचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे आता नागरिकांच्या माध्यमातून हिवाळ्याला केव्हा सुरुवात होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो अशी माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिली आहे. याशिवाय, शेतकऱ्यांकडून यावर्षी हिवाळ्यात पाऊस पडणार का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात आता 28 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत कुठेच मोठा पाऊस पडणार नाही.
दसरा झाल्यानंतर मात्र हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. दसऱ्यानंतर हवामानात एक मोठा चेंज येईल आणि 28 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठा पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
खरंतर या वर्षी दिवाळी बारा नोव्हेंबरला सुरू होणार आहे. यामुळे 12 नोव्हेंबरच्या सुमारास आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे. याचाच अर्थ यावर्षी हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि दिवाळीच्या काळात यंदा चांगला पाऊस बरसतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.