Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबरावांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या हवामान अंदाजात पंजाब रावांनी दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे.
यंदा दिवाळीच्या काळात पाऊस पडणार की नाही? याबाबत पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात डिटेल माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबरावांचा हा नवीन अंदाज.
काय म्हणतात पंजाबरावं
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे यंदा दिवाळीतही पाऊस पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात आता पावसाचा जोर ओसरणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात सध्याचे हवामान रब्बी पेरणीसाठी पोषक असून लवकरच थंडीला सुरुवात होईल असे म्हटले आहे.
उद्या अर्थात 24 ऑक्टोबरला सकाळी धुके येईल. 25 ऑक्टोबरला आणखी मोठ्या प्रमाणात धुके येईल आणि थंडीला सुरुवात होणार आहे. आता पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला आहे यामुळे शेतकऱ्यांनी चना पेरणी करून घ्यावी.
ज्या शेतकऱ्यांची चना पेरणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे. कारण की रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सध्याचे वातावरण हे खूपच पोषक आहे. तथापि पंजाबरावांनी दिवाळीच्या काळात पाऊस पडू शकतो असे सुद्धा म्हटले आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 30 अन 31 ऑक्टोबर आणि एक, दोन, तीन नोव्हेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदा दिवाळीच्या काळात पाऊस पडणार असे त्यांनी सांगितले आहे.
24 ऑक्टोबर पासून म्हणजेच उद्यापासून पुढील पाच-सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील पण दिवाळीत पाऊस होणार आहे. दरम्यान पाच नोव्हेंबर पासून यावर्षी थंडीची तीव्रता वाढेल 5 नोव्हेंबर पासून कडाक्याची थंडी पडेल असेही पंजाबरावांनी आपल्या नवीन अंदाजात क्लिअर केले आहे.