Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे रब्बी हंगामातील सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. यानंतर या चालू वर्षाची सुरुवात देखील पावसाने झाली. यामुळे गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले.
कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून मात्र राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळत आहे. अशातच, आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात मोठा चेंज पाहायला मिळणार आहे.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली आहे.
केव्हा बरसणार अवकाळी पाऊस ?
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील पाच दिवस अर्थातच 10 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. आजपासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही.
मात्र यानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारी नंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होईल आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस बरसेल. एवढेच नाही तर या कालावधीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
कुठं बरसणार अवकाळी पाऊस
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, 11 फेब्रुवारी पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.
या कालावधीत राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे.
याशिवाय अमरावती, अकोला, चांदूरबाजार, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजी नगर येथेही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.