Panjabrao Dakh News : भारतीय हवामान विभागाने 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने 26 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रात तर गारपिट होणार असा अंदाज दिला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पावसाची शक्यता लक्षात घेऊन अधिक सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील राज्यातील हवामानासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Dakh यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 24 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून पुढील तीन दिवस अर्थातच 27 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.
दरम्यान राज्यात या कालावधीमध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही याची नोंद मात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. अवकाळी पाऊस हा कधीच सर्व दूर पडत नाही. यामुळे या कालावधीत पडणारा पाऊस हा सर्व दूर पडणार नाही.
जर समजा एखाद्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला तर काही भागात या कालावधीमध्ये उघडीप राहणार आहे. पण या कालावधीमध्ये पंजाबरावांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे विज पडण्याच्या घटनेत वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे.
एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून राज्यातील कोकणसह विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.