Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. त्यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार असा अंदाज दिला आहे.
एवढेच नाही तर राज्यातून अवकाळी पाऊस केव्हा माघार घेणार याबाबत देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण पंजाब रावांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार यासंदर्भात जारी केलेला नवीन अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणालेत डख
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच एक आणि दोन मार्च 2024 ला राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पारोळा, यावल, कन्नड, बुलढाणा, अकोट, अकोला, अमरावती या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
दुसरीकडे या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी दिला आहे.
तसेच तीन मार्च 2024 पर्यंत कोकणात ढगाळ हवामान कायम राहणार असे त्यांनी म्हटले असून या कालावधीत कोकण विभागात पाऊस होणार नसल्याने तेथील शेतकऱ्यांनी फारशी चिंता करू नये असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान मराठवाड्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. आगामी दोन दिवस येथे ढगाळ हवामान राहणार आहे, मात्र येथे मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
मराठवाड्यात अगदीच तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. म्हणजेच एखाद-दोन ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. पण पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.
यामुळे तेथील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे असा सल्ला यावेळी पंजाब रावांनी दिला असून महाराष्ट्रात तीन मार्च 2024 नंतर पुन्हा एकदा हवामान कोरडे होईल असा महत्त्वाचा अंदाज यावेळी पंजाब रावांनी सार्वजनिक केला आहे.
यामुळे आता तीन मार्च नंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.