Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरल्याचे जाहीर केले आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातून आगामी दोन दिवसात मान्सून परत जाणार आहे. यामुळे आता राज्यातील बहुतांश विभागात ऑक्टोबर हिटचा अनुभव येत आहे.
ऑक्टोबर हिटमुळे सर्वसामान्य नागरिक परेशान झाले आहेत. इकडे राज्यातील ग्रामीण भागात सोयाबीन, मका, कापूस या पिकांची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हार्वेस्टिंगची कामे करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी कमी पावसामुळे पिकांचे उत्पादन खूपच घटले आहे. यामुळे शेतकरी खूपच नैराश्यात आहेत.
दरम्यान राज्यात ऑक्टोबर हिटचा हा महिना उलटल्यानंतर थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यानंतर मग देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत सुरू होणार आहे.
अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे यंदा हिवाळ्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबरावांनी याबाबतचा सविस्तर असा हवामान अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता 25 ऑक्टोबर पर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही. याचाच अर्थ यावर्षीचा नवरात्र उत्सव आणि विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण हा कोरडाच जाणार आहे. खरंतर, दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यात कुठे ना कुठे पावसाची हजेरी लागतेच.
परंतु यंदा नवरात्र उत्सवात पाऊस पडणार नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. मात्र नवरात्र उत्सव उलटल्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. म्हणजेच यावर्षी ऐन हिवाळ्यात पावसाची हजेरी लागणार आहे.
पंजाब डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार यंदा 25 ऑक्टोबर पासून ते पाच नोव्हेंबर राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता तयार होणार आहे. एवढेच नाही तर यावर्षी दिवाळीच्या काळातही पाऊस होणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक पेरणी करताना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
पंजाबरावांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा पिक पेरणी करण्यापूर्वी एका स्टीलच्या वाटीत खोबरेल तेल घेतले पाहिजे आणि हे तेल एका ठिकाणी ठेवायचे आहे. जर हे तेल सकाळी घट्ट झाले तर गहू आणि हरभरा पिक पेरणी केली पाहिजे.