Panjabrao Dakh News : यावर्षी अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आला होता. हा धोंड्याचा महिना दर तीन वर्षांनी येतो. यंदा मात्र धोंड्याचा महिना श्रावण मध्ये आला. यामुळे श्रावण महिना डबल आला आहे. पण हा श्रावण अधिक मास शेतकऱ्यांसाठी मोठा घातक ठरला आहे.
वडीलधाडील मंडळींने श्रावण महिन्यात अधिक मास आला असल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती तयार झाली आणि कमी पडला असावा असा अंदाज बांधला आहे. असेच काहीसे मत पंजाब रावांनी देखील व्यक्त केले आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी श्रावण अधिक मास आला आणि यामुळे ऑगस्टपर्यंत अपेक्षित असा पाऊस राज्यात पडला नाही.
मात्र ज्या वर्षी धोंड्याचा महिना येतो म्हणजेच अधिक मास येतो त्यावर्षी ऑगस्टनंतर परिस्थिती बदलते. धोंड्याचा महिना ज्या वर्षी येतो त्यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडतो असे त्यांनी म्हटले आहे. यंदाही असच काहीच होणार आणि आता सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस होणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
केव्हा सुरु होणार मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि कोकणात रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र राज्यात अजूनही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत.
तळहातांच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाअभावी करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात सात सप्टेंबर पर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही हवामान तज्ञांनी सप्टेंबर महिन्यात देखील फारसा पाऊस होणार नाही असे नमूद केले आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी मात्र 31 ऑगस्ट पर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणारा असा अंदाज व्यक्त केला आहे.
5 सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. यामुळे आता पंजाबरांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.