Panjabrao Dakh News : यंदाच्या दिवाळीच्या आनंदावर विरजन पडणार असे दिसत आहे. खरेतर, सध्या दीपोत्सवाचा आनंददायी पर्व सर्वत्र मोठ्या थाटात साजरा होत आहे. पण, याच दिवाळी पाडव्याच्या दिवशीचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज दिला आहे. यात पंजाब रावांनी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सुद्धा पावसानेच होणार असा अंदाज दिलाय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र विभागातील जवळपास दहा जिल्ह्यात एक नोव्हेंबर पासून पाऊस सुरू होणार असे पंजाबरावांनी म्हटले असून पुढील दोन दिवस अर्थातच 3 नोव्हेंबर पर्यंत या भागात पावसाची शक्यता असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीच्या कामांचे नियोजन करावे.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी ?
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात एक नोव्हेंबर पासून ते तीन नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या काळात मराठवाडा विभागातील बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
अर्थातच मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण फार अधिक राहणार नाही. या भागात ढगाळ हवामान आणि अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये एक नोव्हेंबर पासून ते तीन नोव्हेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण मराठवाड्यातील जिल्ह्यांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्रातील या सदरील पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी असे म्हटले गेले आहे. दरम्यान तीन नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होणार आहे.
तसेच पाच नोव्हेंबर पर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यातही हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पाच नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.