Panjabrao Dakh News : पंजाबरावांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला होता. या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावणार आणि ढगाळ हवामान राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला होता.
विशेष म्हणजे पंजाबरावांचा हा हवामान अंदाज आता खरा ठरला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली आहे.
आज सकाळपासूनच राज्यातील विदर्भ विभागाच्या बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच दुपारच्या सुमारास मोताळा तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी सुद्धा लागली आहे.
यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील ओव्हा या गावात व आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज खरा ठरला असल्याने आता पुढील काही दिवस राज्यातील कोणकोणत्या भागात अवकाळी पाऊस बरसणार याबाबत पंजाबरावांनी काय हवामान अंदाज वर्तवला आहे? याबाबत अनेकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे आता आपण पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाबरावांचा हवामान अंदाज काय ?
डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 9 जानेवारीपर्यंत राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही मात्र रिमझिम पावसाचा अंदाज डख यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
तसेच या कालावधीमध्ये विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.