Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. आता राज्यात दिवसा देखील गारठा जाणवत आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला होता. बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानही तयार झाले होते.
मात्र आता पुन्हा एकदा हवामान पूर्वपदावर आले असून जाता-जाता थंडी चांगलाच कहर माजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
मात्र गेल्या वर्षभरापासून पावसाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. केव्हा अवकाळी पाऊस हजेरी लावेल हे सांगता येत नाही.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात हवामान कसे राहणार, अवकाळी येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणत आहेत पंजाबराव डख
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात 4 फेब्रुवारी पर्यंत हवामान कसे राहणार याबाबत माहिती दिलेली आहे. या कालावधीत या विभागात थंडीचा जोर वाढणार की अवकाळी पाऊस पडणार याविषयी डख यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे.
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात 4 फेब्रुवारी पर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या भागात किमान तापमान 9 अंशा पर्यंत खाली येणार असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या भागात चार तारखेपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रमध्ये सुद्धा चार तारखेपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. येथे देखील आगामी काही दिवस अवकाळी पाऊस पडणार नाही, हवामान कोरडे राहील आणि थंडीचा जोर वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाडा : मराठवाडा विभाग अर्थातच छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजीनगर सह संपूर्ण सहा जिल्ह्यात चार तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. येथे देखील अवकाळी पाऊस हजेरी लावणार नाही. या विभागात हळूहळू थंडीचा जोर वाढणार आहे.
विदर्भ : पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील हवामान कोरडे राहणार आहे. ढगाळ हवामान राहणार नाही. अवकाळी पाऊस बरसणार नाही. येथे थंडीचा जोर हळूहळू वाढेल असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. विदर्भात चार तारखेपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.