Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील हवामानात आता पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला.
काही भागांमध्ये गारपिट देखील झाली. या महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली. अवकाळी पावसामुळे मात्र रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
फळबागांवर देखील अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. रब्बी हंगामातील हरभरा या मुख्य पिकावर मर रोगाचे सावट तयार झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी हरभरा पीक वाया गेले आहे.
काही शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी सुद्धा करावी लागली आहे. अशातच आता राज्यातील हवामानात मोठा चेंज झाला असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून हळूहळू थंडीची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 19 ते 30 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीमध्ये राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. तसेच राज्यामध्ये या कालावधीत कडाक्याची थंडी पडणार आहे.
महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या उत्तरेकडून वारे वाहत असल्याने याचा परिणाम म्हणून आता दिवसा देखील थंडी वाजणार आहेत.
दिवसा स्वेटर घालावे लागणार अशी परिस्थिती तयार होणार असल्याचे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत 19 ते 30 डिसेंबर दरम्यान म्हणजेच दहा दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील आणि थंडीची लाट येणार आहे.
तसेच या चालू महिन्यात आता कुठेच अवकाळी पाऊस बरसणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र असे असले तरी पुढील महिन्यात अर्थातच जानेवारीमध्ये एक मोठा अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी दिला आहे.
म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार आहे. निश्चितच पुढील महिन्यात अवकाळी पावसाचे सावट तयार होणार असल्याने याचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.