Panjabrao Dakh News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ अनुभवायला मिळाला. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली.याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली.
एवढेच नाही तर रब्बी हंगाम देखील कमी पावसामुळे प्रभावित झाला आहे. शिवाय ऐन हिवाळ्यातच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यामुळे आता 2024 चा मान्सून कसा राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
सर्वसामान्यांना देखील 2024 च्या मान्सूनची चिंता लागलेली आहे. 2024 मध्ये जर चांगला पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट असेल आणि यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांचे सुद्धा मोठे नुकसान होईल असे बोलले जात आहे.
अशातच मात्र स्कायमेट या भारतातील खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यावर्षी भारतात सामान्य पाऊस राहील असा दावा केला आहे.
एल निनोच संकट येत्या दोन महिन्यात नाहीस होईल आणि भारतात या मान्सून काळात सामान्य पाऊस बरसणार असे स्कायमेटने आपल्या प्राथमिक हवामान अंदाजात म्हटले आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील मान्सून 2024 मध्ये कसा मान्सून राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
2024 चा मान्सून कसा राहणार ?
गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून खूपच कमकुवत होता. कमकुवत मान्सूनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान यावर्षी देखील कमकुवत मान्सून राहणार का हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ज्यावर्षी अफगाणिस्तान, पाकिस्तान, गुजरात, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर येथे हिवाळी काळात थंडीची लाट सक्रिय राहते त्यावर्षी महाराष्ट्रात मान्सून काळात चांगला पाऊस पडतो असे म्हटले आहे.
सध्या स्थितीला या पट्ट्यात थंडीची लाट सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत 2024 च्या मान्सूनमध्ये अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
यामुळे आता पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.