Panjabrao Dakh News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. भारतीय हवामान खात्याने आणि ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी राज्यात 16 मार्च पासून पावसाची शक्यता वर्तवली होती.
यानुसार सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील बहुतांशी जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाचे अतोनात असे नुकसान झाले आहे. शिवाय कांदा तसेच इतर फळ पिकांना देखील याचा फटका बसला आहे. विशेष बाब अशी की, आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरूच राहणार आहे.
अर्थातच महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट अजून पूर्णपणे दूर झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच आणखी काही दिवस आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
तसेच, आपल्या पशुधनाची देखील काळजी घेण्याचे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्चपर्यंत राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली तसेच तेलंगाना आणि छत्तीसगड येथे मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
तेलंगाना आणि छत्तीसगड येथे मोठ्या पावसाची शक्यता असल्याने याचा फटका राज्यातील सीमावर्ती भागाला देखील बसणार अशी शक्यता आहे. राज्यातील अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा या भागात देखील पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. मात्र या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भात जास्तीचा पाऊस पडेल तर पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भाच्या तुलनेत कमी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तसेच या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कुठेच अवकाळी पावसाची शक्यता नाहीये.
मराठवाड्यात देखील कुठेच पाऊस होणार नाही परंतु मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात तर पुढील जवळपास 20 दिवस अवकाळीचे सावट राहणार नसल्याचा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात पुढील 20 दिवस पाऊस होणार नाही, हवामान कोरडे राहील असे त्यांनी म्हटले आहे. तसेच 22 मार्चनंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढणार आहे. काही ठिकाणी 43 ते 44° c पर्यंत तापमानाचा पारा जाईल असे देखील त्यांनी यावेळी आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.