Panjabrao Dakh New Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. खरंतर या वर्षी पावसाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडला होता.
मात्र जुलै महिन्यात हवामानात मोठा बदल झाला आणि जोरदार पावसाची हजेरी लागली. जुलैमध्ये राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघण्यास मदत झाली होती. यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल 25 ते 26 दिवसांचा खंड पाडला. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधव संकटात आले.
अनेक भागातील खरीप हंगामातील पिके अक्षरशः पाण्याअभावी करपून गेलीत. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली. यामुळे ज्याप्रमाणे जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यातील पावसाने भरून काढली होती तशीच काहीशी परिस्थिती तयार होईल आणि आता ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट सप्टेंबर महिन्यातील पाऊस भरून निघेल असे सर्वसामान्यांना वाटत होते.
मात्र तसे काही झाले नाही दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली मात्र 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या चार दिवसांच्या काळातच राज्यात चांगला पाऊस झाला. 11 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा राज्यातून पावसाने काढता पाय घेतला. मध्यंतरी 14 सप्टेंबर रोजी म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी आणि 19 सप्टेंबर रोजी अर्थातच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागली.
मात्र जोरदार पाऊस कुठेच झाला नाही. यामुळे सध्या मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अशातच पंजाबराव डख यांनी पावसाबाबत अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून हे चक्रीवादळ छत्तीसगड, मध्य प्रदेशमार्गे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात दाखल होणार असून याच्या प्रभावामुळे राज्यात आता पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस होणार नाही भाग बदलत पाऊस पडेल असे देखील त्यांनी सांगितले आहे. याशिवाय, त्यांनी शेतकरी बांधवांना जर त्यांचे सोयाबीन काढण्यासाठी आले असेल तर पाच ऑक्टोबरच्या पूर्वीच काढणी करून घ्यावी असे सांगितले आहे. कारण की, राज्यात तीन ऑक्टोबरला बंगालच्या खाडीत तीव्र चक्रीवादळ येणार असून यामुळे 5 ऑक्टोबर पासून राज्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.