Panjabrao Dakh : पंजाबरावांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी 23 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. खरे तर गेल्या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागली.
यानंतर नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. एकतर खरीप हंगामातुन कमी पावसामुळे खूपच कमी उत्पादन मिळाले आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण मदार रब्बी हंगामावर आहे. मात्र ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित झाला आहे.
परिणामी ज्या भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान होते तेथील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता पुढील काही दिवस हवामान कसे असेल याबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज काय म्हणतोय ?
कोकण विभाग : 23 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत येथील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. 25 जानेवारीपासून या विभागात थंडीचा जोर वाढवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र : 23 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत येथे देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तिथे देखील 25 जानेवारीपासून थंडीचा जोर वाढेल असे पंजाबरावांनी म्हटले आहे.
उत्तर महाराष्ट्र : 23 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत उत्तर महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. विशेष म्हणजे 25 तारखेनंतर या देखील विभागात थंडीचा जोर वाढणार आहे.
मराठवाडा : मराठवाड्यात आज आणि उद्या ढगाळ हवामान राहील असा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता असून 25 जानेवारी नंतर येथे देखील थंडीचा जोर वाढणार आहे.
पश्चिम विदर्भ : येथे देखील आज आणि उद्या ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत येथे हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर वाढत राहणार आहे.
पूर्व विदर्भ : पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आज आणि उद्या वर्धा, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र 25 नंतर येथील हवामान देखील पूर्व पदावर येईल आणि थंडीचा जोर वाढेल असे पंजाब रावांनी म्हटले आहे.