Panjabrao Dakh : पंजाबरावांनी सात दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत यूट्यूब चैनलवर महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाची अपडेट दिली होती. पंजाब डख यांनी त्यावेळी आपल्या हवामान अंदाजात 10 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहील आणि त्यानंतर वादळी अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
दरम्यान पंजाबरावांचा हा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पंजाबरावांनी अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती आणि सध्या राज्यात गारपीट सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल आणि परवा राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे.
काल अर्थातच 11 फेब्रुवारी 2024 ला राज्यातील विदर्भ विभागातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला आहे.
त्यामुळे पंजाबरावांनी नेमका काय हवामान अंदाज वर्तवला आहे, आता पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसे राहणार ? याबाबत पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज आपण पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे हवामान अंदाज
पंजाबरावांनी राज्यात 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
विशेष म्हणजे राज्यातील अमरावती, अकोला, चांदूरबाजार, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
एकंदरीत राज्यात 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.