Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. विशेषता गेल्या तीन ते साडेतीन महिन्यात सातत्याने हवामानात बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारीत अवकाळी पावसाची हजेरी लागल्यानंतर आता फेब्रुवारीत देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे.
विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आज अर्थातच 17 फेब्रुवारीला देखील राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे.
दुसरीकडे, जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आता राज्यात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 17 फेब्रुवारी पासून ते 29 फेब्रुवारी पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या कालावधीत राज्यात कुठेच अवकाळी पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे पंजाब रावांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, या कालावधीत रब्बी हंगामातील काढणीसाठी तयार झालेल्या पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून हार्वेस्टिंग केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
कारण की, राज्यात पुन्हा एकदा फेब्रुवारी अखेरीस अवकाळीचे ढग गडद होणार आहेत. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता 29 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे हा पाऊस मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. 29 फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पावसाची शक्यता तयार होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिलेला आहे.
मात्र या कालावधीत राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार याबाबत अद्याप पंजाबरावांनी स्पष्टोक्ती दिलेली नाही. पण, लवकरच याबाबत डख यांच्याकडून माहिती दिली जाणार आहे.