Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. खरेतर, गेल्या नऊ ते दहा दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. एकीकडे, राज्यात वादळी पावसाचे थैमान पाहायाला मिळत आहे तर दुसरीकडे काही भागांमधील तापमान ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काल उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावातील तापमान 43 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे आगामी काही दिवस तापमान असेच चढे राहणार असा अंदाज आहे.दुसरीकडे हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात वादळी पावसाची देखील शक्यता कायम ठेवली आहे.
IMD ने मंगळवार पर्यंत महाराष्ट्रात वादळी पावसाचे सत्र सुरू राहणार असा अंदाज यावेळी वर्तवला आहे. अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील नवीन हवामान अंदाज दिला आहे.
पंजाबरावांनी त्यांच्या अधिकृत youtube चैनल वर दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 दरम्यान राज्यातील 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे यावेळी डख यांनी नमूद केले आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार वादळी पाऊस ?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 28 एप्रिल दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या बारा ते तेरा जिल्ह्यांमध्ये दर दोन दिवसांनी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. म्हणजे आज ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल त्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा दोन दिवसांनी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी बांधला आहे.
या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.