Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक बागायतदारांसाठी खूपच खास राहणार आहे. खरंतर सध्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागांमध्ये द्राक्ष बागांची छाटणीची कामे प्रगतीपथावर आहेत.
अशातच आता राज्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गांधी जयंती पर्यंत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
पंजाबरावांनी काल अर्थातच 25 सप्टेंबर 2023 ला सायंकाळी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागात 26 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत खूपच मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
खरंतर जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात तर जवळपास 21 ते 22 दिवसांचा पावसाचा खंड होता. अशा स्थितीत खरीप हंगामातील पिके तसेच फळबागा पाण्याअभावी धोक्यात सापडल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांची पिके वाळून गेली होती. मात्र या चालू सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध भागात चांगला जोरदार पाऊस बरसत आहे.
राज्यात गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाचा जोर 22 सप्टेंबरपासून अधिक वाढला आहे. अशातच आता महाराष्ट्रात दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच गांधी जयंतीपर्यंत जोरदार पाऊस बरसत राहणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, कोल्हापूर, आटपाडी, मिरज, कर्नाटकचा काही भाग, रत्नागिरी या भागात एक दिवस आड 2 ऑक्टोबर पर्यंत रोज जोरदार पाऊस पडणार आहे.
तसेच पंजाबरावांनी कालपासून अर्थातच 25 तारखेपासून राजस्थान मधून मान्सूनचा प्रथेचा प्रवास सुरू झाल्याची माहिती दिली असून आपल्या महाराष्ट्रातून पाच ऑक्टोबरपासून मान्सून माघारी फिरणार असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.