Panjabrao Dakh Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून अर्थातच 16 जून पासून ते 23 जून पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश, मराठवाडा या विभागात पावसाची शक्यता आहे. मात्र या विभागांमध्ये सगळीकडेच पाऊस पडणार नाही.
म्हणजेच आज एक गावात पाऊस पडला तर उद्या दुसऱ्या गावात पाऊस पडणार अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे. अर्थातच आज पासून पुढील नऊ दिवस महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
तथापि या कालावधीत म्हणजेच 16 जून ते 23 जून या कालावधीत राज्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, परभणी, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये एक-दोन मोठा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याची देखील नोंद घ्यायची आहे.
एकंदरीत आज पासून पुढील नऊ दिवस राज्यात एक दिवसाआड पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही तर तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. मात्र 23 जून नंतर महाराष्ट्रात मोठ्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात 24 जून पासून 30 जून पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असे पंजाब रावांनी म्हटले आहे.
या काळात जवळपास सगळीकडेचं पाऊस पडणार आहे. 24 जून पासून ते 30 जून पर्यंतच्या 5-6 दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात सगळीकडेचं खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाब रावांनी व्यक्त केली आहे. खरे तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची थोडीशी विश्रांती पाहायला मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर अजून एकदाही चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे खानदेशातील नंदुरबार आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून पोहोचलेला नाही. परंतु येत्या चार-पाच दिवसांमध्ये यासंबंधीत जिल्ह्यात देखील मान्सूनचे आगमन होणार आहे.
दुसरीकडे आता पंजाब रावांनी आजपासून पुढील नऊ दिवस महाराष्ट्रात रोज भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असून 24 जून पासून ते 30 जून पर्यंत महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जिथे अजूनही मोठा पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार अशी आशा आहे.