Panjabrao Dakh Havaman Andaj : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात यंदा फक्त 88% एवढा पाऊस झाला आहे.
म्हणजेच यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल 12 टक्के कमी पाऊस बरसला आहे. यामुळे महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट आहे. राज्य शासनाने राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ देखील जाहीर केला आहे. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा बिकट आहे. राज्यात दुष्काळाची झळ 40 तालुक्यांपेक्षा अधिक भागावर पाहायला मिळत आहे.
परंतु केंद्र शासनाच्या जटिल निकषांमुळे राज्यातील फक्त 40 तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात परिस्थिती एवढी बिकट आहे की काही ठिकाणी हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होणार असे सांगितले जात आहे. यावरून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांना किती त्रास सहन करावा लागू शकतो हे आपल्या लक्षात येऊ शकणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा चेंज पाहायला मिळत आहे. राज्यात आता सकाळी-सकाळी थंडी भासू लागली आहे. पण दुपारी अजूनही उन्हाचे चटके बसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात किंचित वाढ देखील झाली आहे. किमान तापमान देखील थोडेसे वाढलेले आहे.
विशेष म्हणजे हवामान खात्याने कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची देखील शक्यता वर्तवली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशातच, आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील महाराष्ट्रातील काही भागात पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आजपासून अर्थातच 7 नोव्हेंबर पासून ते 11 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आजपासून रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जत, अक्कलकोट, विटा, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, लातूर, दौंड, बारामती, पुणे, जुन्नर, नाशिक, ओतूर, उदगीर, निजामाबाद, देगलूर, ओझर, मुंबई, अहमदनगर, केज, धारूर, आंबेजोगाई, हिंगोली, नांदेड, पूर्णा, वसमत, सेलू, परभणी, माजलगाव, गंगापूर, वैजापूर, जालना, सिल्लोड, पुसद, चिखली, नाशिक, वाशिम, कन्नड, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वनी, श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर या भागात अवकाळी पाऊस पडू शकतो.
आज पासून ते 11 तारखेपर्यंत या संबंधित भागातील 30 किलोमीटरच्या परिघात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात कमी पाऊस बरसणार आहे पण दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात या कालावधीमध्ये जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
तसेच या टाईम पिरियड मध्ये राज्यातील अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, विशेषता निजामाबाद परिसर, उस्मानाबाद, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच ग्रेप सिटी नासिक मध्ये जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पण हे भाग सोडता राज्यातील उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात कुठेच पाऊस बरसणार नाही असे देखील यावेळी पंजाब डख यांनी नमूद केले आहे. विशेष बाब अशी की दिवाळीनंतर आणखी एक मोठा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आहे. दिवाळीनंतर विशेषतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात यंदा चांगला पाऊस परसणार असं मत त्यांनी वर्तवल आहे.
यामुळे आता पंजाब डख यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. तथापि महाराष्ट्रातील या संबंधित भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने नागरिकांनी अधिक सजग आणि सतर्क राहणे अपेक्षित आहे.