Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडे झाल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून आता हवामान पूर्णपणे कोरडे झाले असून तापमानाचा पारा हा 38 ते 40°c पर्यंत पोहोचला आहे.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे 40°c तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र काल अर्थातच गुरुवारी राज्यात थंड वारे सुटले आणि यामुळे तापमानात थोडीशी घट आली आहे. तथापि राज्यातील अनेक भागात अजूनही तापमानाचा पारा वाढलेला आहे.
अशातच आता राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी आणि गारपिटीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी वर्तवला आहे.
यामुळे रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष बाब अशी की पंजाबरावांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसासह काही ठिकाणी तुफान गारपीट होणार असा अंदाज दिला आहे.
यामुळे पंजाबरावांनी नेमक्या कोणत्या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात होणार गारपीट ?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी दोन दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. 17 मार्चनंतर मात्र राज्यातील हवामानात बदल होणार आहे. 17 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत अर्थातच चार दिवस राज्यातील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
तसेच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील गडचिरोली, वर्धा, भंडारा, नागपूर, चंद्रपूर या पूर्व भागातील काही जिल्ह्यात तुफान पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
तसेच यवतमाळ, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोट, अचलपूर, अकोला, बुलढाणा या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे.
पंजाबरावांनी पूर्व विदर्भात जास्तीचा पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे तर पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. उर्वरित राज्यात मात्र कुठेच पाऊस होणार नाही परंतु काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
विशेष बाब अशी की, 21 मार्चनंतर हवामान कोरडे होईल आणि तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल असे देखील पंजाबराव यांनी म्हटले आहे. यामुळे आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हा नवीन हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणारा आहे.