Panjabrao Dakh : महाराष्ट्रात आजपासून अर्थातच 6 डिसेंबर 2023 पासून ते 8 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
खरे तर गेल्या महिन्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागलेली. गेल्या महिन्यात झालेला पाऊस आणि गारपीट राज्यातील शेती पिकांसाठी खूपच घातक ठरली आणि शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वाया गेले.
या चालू महिन्याच्या सुरवातीला पावसाचा जोर थोडासा कमी झाला. यामुळे आता पुन्हा एकदा हवामान पूर्वपदावर येईल आणि शेती पिकांना दिलासा मिळेल असे वाटत होते.
पण, अवकाळी पावसाचे सावट अजूनही गेलेले नाही. राज्यात अजूनही काही दिवस अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने आगामी दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव ढक यांनी देखील 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या खाडी तयार झालेले चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताच धोका नाही.या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही.
मात्र यामुळे राज्यातील पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चांदूरबाजार, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडेल असे हवामान तज्ञ डख यांनी नमूद केले आहे.
याशिवाय मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
परंतु, मराठवाड्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात प्रामुख्याने ढगाळ हवामान राहील त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.