Panjab Dakh News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा म्हणजे जवळपास सर्वच विभागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. सर्वत्र ढगाळ हवामान नाही मात्र, काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले आहे.
तसेच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची सुद्धा हजेरी देखील लागली आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एक तर गेल्या वर्षी शेवटी-शेवटी अवकाळी पावसाने महाराष्ट्राला चांगले झोडपले होते.
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाका पाहायला मिळाला होता. त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसाने अगदी वाढीच्या अवस्थेत आणि सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला.
यामुळे पिकाची वाढ खुंटली. मध्यंतरी झालेल्या जोरदार थंडीमुळे या धक्क्यातून पिके कशीबशी सावरलीत. मात्र अशातच नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाली असल्याने या पिकांना पुन्हा मोठा फटका बसला आहे.
खरेतर देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट येत आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. म्हणजेच देशात विरोधाभासी वातावरण पाहायला मिळत आहे.
आता मात्र देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील हवामान आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे आता राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आता राज्यात आकाश निरभ्र होईल आणि हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे. तसेच, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2024 दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे आज पासून पुढील पंधरा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या कालावधीत अवकाळी पाऊस पडणार नाही, असा अंदाज त्यांनी दिला आहे.
पण येत्या काही दिवसात राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता मात्र त्यांनी वर्तवली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 15, 16 आणि 17 जानेवारी 2024 ला ढगाळ हवामानाचा अंदाज आहे.
यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा रब्बी हंगामातील शेती पिकांवर ढगाळ हवामानाचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो.