Panjab Dakh New Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे राज्यात 8 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेला पाऊस या सप्टेंबर महिन्यात जोरदार बरसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस देखील झाला आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात 9 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडत राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाब डख यांनी देखील राज्यात 8 सप्टेंबर पासून ते 25 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता असल्याचे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.
या चालू महिन्यात 25 सप्टेंबरपर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे वीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील ज्या भागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नसेल त्या भागात समाधानकारक पाऊस होणार असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे जर पंजाब डख यांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे.