Panjab Dakh Latest News : परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
बंगालच्या खाडी तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडणार आहे. वास्तविक या बंगालच्या खाडी तयार झालेल्या मिचँग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नाही.
परंतु याच्या प्रभावाखाली राज्यात रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे मोठा पाऊस देखील पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक अवकाळी मुळे हिरावून घेतले जाणार आहे.
यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वासिम, यवतमाळ, चांदूरबाजार, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार असे त्यांनी सांगितले आहे.
याशिवाय मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, संभाजी नगर, जालना या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यात पडणारा पाऊस हा सर्व दूर राहणार नाही तुरळक ठिकाणीच पडेल याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे.
सोबतच या कालावधीमध्ये राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विभागात आणि कोकणात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान खात्याने सुद्धा आगामी 48 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडी ने बंगालच्या खाडी तयार झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.
आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. याशिवाय उद्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडणार असे हवामान खात्याने यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध आणि सतर्क राहणे अपेक्षित आहे.