Panjab Dakh Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. अजूनही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे.
24 तासांचा विचार केला असता गेल्या 24 तासात राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर मधील काही भाग छत्रपती संभाजी नगर मधील काही भागात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तर संबंधित जिल्ह्यांमधील काही भागात गारपीट देखील झाले आहे. तसेच पुणे, मुंबई शहरातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही भागात गारपीट झाली असल्याने तेथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज दिला होता.
त्यासोबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील 19 नोव्हेंबरला आपल्या सुधारित हवामान अंदाजात राज्यातील काही भागांमध्ये 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.
त्यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. म्हणजेच हवामान खात्याचा आणि पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला आहे.
अशा परिस्थितीत आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत पंजाबरावांनी काय हवामान अंदाज दिला आहे याबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आपण पंजाबरावांनी महाराष्ट्रात किती तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या तारखेपर्यंत पडणार पाऊस
डख यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 27 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विदर्भ विभागातील काही भाग, मराठवाडा विभागातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजेच राज्यात आज पावसाची शक्यता आहे. आज राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोबतच शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची आणि आपल्या शेती पिकांची पावसाची शक्यता लक्षात घेता संरक्षण करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. एकंदरीत राज्यात उद्यापासून अवकाळी पाऊस विश्रांती घेऊ शकतो अशी शक्यता आहे.