Paddy Farming : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. मार्च महिना येत्या काही दिवसात संपणार आहे. यामुळे आता संपूर्ण देशभरात आगामी खरीप हंगामासाठी जमिनीची पूर्व मशागत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नांगरणीची कामे सुरू आहेत.
जिथे गेल्यावर्षी कमी पाऊस झाला होता आणि जिथे उन्हाळी हंगामात पीक लागवड करणे अशक्य आहे अशा भागांमध्ये आगामी खरीप हंगामासाठीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामात आपल्या राज्यात सोयाबीन, कापूस या पिकांसमवेतच धान म्हणजे तांदळाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
धानाची लागवड महाराष्ट्रात कोंकण आणि विदर्भ विभागातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. धान लागवड ही खरीप हंगामात होते मात्र यासाठी बियाणे खरेदीची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे.
धानाची रोपे एप्रिल-मे महिन्यात तयार केली जातात. दरम्यान रोपवाटिका तयार करण्यापूर्वी शेतकरी बांधव बियाणे खरेदी करतात. यामुळे राज्यातील अनेक धान उत्पादक भागांमध्ये धान बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण धानाच्या एका सुधारित वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
स्वर्ण सब वन हे तांदळाचे वाण गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून प्रचलित आहे. हे एक सुधारित वाण आहे. याची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळते.
धानाच्या या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर अतिवृष्टी झाली आणि शेतात सलग 15-16 दिवस पाणी साचून राहिले तरी देखील या जातीच्या पिकावर फारसा विपरीत परिणाम पाहायला मिळत नाही. या जातीचे पीक रोवणीनंतर 140 दिवसात परिपक्व होते.
या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळते. ज्या ठिकाणी पावसाळ्यात अतिवृष्टी होते अशा भागातील शेतकऱ्यांसाठी तांदळाचे हे वाण फायदेशीर ठरू शकते.खरेतर तांदळाचा हा वाण 2009 पासून लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
आपल्या राज्यातही या जातीची लागवड पाहायला मिळते. हा वाण आंध्र प्रदेश मधील एका कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. परंतु राज्यातही या जातीची लागवड होते. याची लागवड ही कोकण आणि विदर्भातील शेतकरी करू शकतात.
कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. विदर्भात देखील जिथे धान लागवड होते तिथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत या सदर भागांमध्ये या जातीची लागवड करून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन या ठिकाणी मिळवता येणे शक्य होणार आहे.