Paddy Farming : खरीप हंगाम सुरू होण्यासाठी आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मान्सूनची चाहूल लागली आहे. अशातच यंदा मान्सून तीन ते चार दिवस उशिरा दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत. मान्सूनचे आगमन झाल्याबरोबरच शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग वाढणार आहे.
यापूर्वीच मात्र शेतकऱ्यांकडून खरीप पूर्वतयारी सुरू करण्यात आले आहे. खरीप हंगामात महाराष्ट्रासह देशातील बहुतांशी भागात भात पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील विदर्भ आणि कोकणात धानाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील शेतकरी मात्र भाताची शेती ही पारंपारिक पद्धतीने रोवणी करून करतात.
म्हणजेच भात रोपांच्या साह्याने भात लागवड केली जाते. मात्र या पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा उत्पादन खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताची रोवणी करण्याऐवजी थेट पेरणी करून भात शेती केली पाहिजे असा सल्ला काही तज्ञ देत आहेत. दरम्यान, आज आपण पेरणी पद्धतीने भात शेती केल्यास शेतकऱ्यांना काय फायदा होतो यासाठी कशा पद्धतीने शेतीची तयारी केली जाऊ शकते तसेच इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डायरेक्ट सीडिंग तंत्रज्ञान म्हणजे थेट पेरणी तंत्रज्ञान म्हणजे काय?
डायरेक्ट सीडिंग टेक्नॉलॉजी ही पीक पेरणीची एक सुधारित पद्धत आहे. या पद्धतीने आता बहुतांशी पिकांची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा मदार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कांद्याची शेती देखील केली जाऊ लागली आहे. म्हणजेच कांद्याची रोपे लागवड करण्याऐवजी थेट बियाणे पेरून कांद्याची लागवड केली जात आहे. याच पद्धतीने भात पिकाचे देखील शेती केली जाऊ शकते. याला डायरेक्ट सीडेड राइस (डीएसआर) असं नाव आहे. ही भात लागवडीची एक पद्धत आहे जिथे भात बियाणे थेट शेतात पेरले जाते.
यामुळे पारंपारिक प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेची गरज दूर होते. म्हणजे भाताची रोपे तयार करून मग त्याची पुनरलागवड करण्याची गरज दूर होते. येथे थेट बियाणे शेतात पेरले जाते. DSR या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भाताच्या शेतात पाणी सोडणे, डबके तयार करणे किंवा रोपवाटिका करून रोपे तयार करण्याची गरज नसते.
यामुळे मोठ्या प्रमाणात लेबर वरील खर्च वाचतो तसेच कृषी निवेष्ठांवरील खर्च देखील यामुळे वाचतो. यामुळे मेहनत देखील शेतकऱ्यांना कमी करावी लागते. ही एक संसाधन-कार्यक्षम पद्धत आहे ज्यासाठी कमी पाणी, श्रम आणि वेळ लागतो. DSR ही एक शाश्वत लागवड पद्धत आहे जी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि नफा मिळवून देऊ शकते, असा दावा तज्ञ लोकांनी केला आहे.
पारंपारिक भात शेती आणि थेट पेरणी पद्धतीने भात शेतीमधील फरक थोडक्यात
पारंपारिक भातशेती
पारंपारिक भात शेतीमध्ये रोपवाटिकेत रोपे तयार प्रत्यारोपण प्रक्रिया:करावी लागतात आणि मग ती शेतात लावली जातात. म्हणजे प्रत्यारोपण प्रक्रिया या पद्धतीच्या भात शेतीमध्ये आवश्यक आहे. परिणामी अधिक श्रम घ्यावे लागते तसेच अधिकचा उत्पादन खर्च करावा लागतो. रोपवाटिका व्यवस्थापन, प्रत्यारोपण आणि शेताच्या देखभालीसाठी मजुरांची अधिक आवश्यकता असते.
यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या श्रमात आणि उत्पादन खर्चात वाढ होते. तसेच पारंपारिक पद्धतीने भात शेती करण्यासाठी पीक लागवडीपूर्व शेतात पाणी सोडले जाते. मग भात पिकासाठी जमिनीची तयारी होते आणि यानंतर भाताच्या रोपांची लागवड केली जाते. यामुळे निश्चितच मेहनत अधिक लागते. शिवाय अशा पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास मोठ्या प्रमाणात रोपे मरतात. पुनर्लावणीमुळे रोपांचे नुकसान होऊ शकते आणि ते मरतात, एकूणच उत्पादन कमी होण्याचा धोका असतो.
थेट पेरणीच तंत्रज्ञान Direct Seeding Technology
या डायरेक्ट सीडींग टेक्नॉलॉजी च्या मदतीने शेतात भाताच्या बियाण्याची थेट पेरणी केली जाते. म्हणजे यासाठी रोपे तयार करावी लागत नाही आणि प्रत्यारोपणाची गरज देखील पडत नाही. यामुळे रोपवाटिका व्यवस्थापन करावे लागत नाही, शेताच्या देखभालीसाठी कमी श्रम घ्यावे लागतात. या तंत्रज्ञानाने भात शेती करण्यासाठी शेतात पाणी सोडावे लागत नाही म्हणून पाण्याचे संरक्षण आणि अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
एकंदरीत पाण्याचा अपव्यय यामुळे टाळला जातो. थेट पेरणीमुळे अधिक बियाणे अंकुरित होतात आणि वाढतात आणि जास्त उत्पादन मिळते. याचाच अर्थ या डायरेक्ट सीडींग टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिकची कमाई करता येणे शक्य बनते.
डायरेक्ट सीडींग टेक्नॉलॉजीने भातशेती करण्याची गरज काय
पारंपारिक भातशेतीसाठी पाणी भरून जमीन तयार करावी लागते, मग तयार केलेली रोपे रोवणी करावी लागतात म्हणजे भाताची पुनरलागवड करावी लागते. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो तसेच अधिक मेहनत घ्यावी लागते, खर्च देखील अधिक लागतो. यामुळे शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळ देखील वाया जातो.
शिवाय वाढती लोकसंख्या पाहता पिक उत्पादनात वाढ घडवून आणणे गरजेचे आहे. पारंपारिक भात शेतीमध्ये भात उत्पादन खूपच कमी होत आहे. आणि कमी होत जाणारे जलस्रोत यामुळे आता पारंपारिक भात शेती पर्यावरणासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी तोट्याची सिद्ध होत आहे.
यासोबतच मजूर इतर विकासकामांकडे वळत आहेत, परिणामी पारंपरिक भातशेतीसाठी कामगार कमी पडत आहेत. म्हणून आता पारंपारिक पद्धतीने भात शेतीला बगल देण्याची गरज भासत आहे.
थेट बीजन तंत्रज्ञानामुळे म्हणजेच थेट पेरणी करून भात लागवड केल्यास पारंपारिक लागवड पद्धतींचा खर्च आणि वेळ कमी होतो, ज्यामुळे हे डायरेक्ट सेलिंग टेक्नॉलॉजी चे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
थेट बीजन तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत होते आणि शेतातून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे ती पर्यावरणास अनुकूल पद्धत बनते.
सुधारित तांदूळ जाती आणि प्रभावी तणनाशकांसह, थेट बीजन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक व्यवहार्य पर्याय बनत आहे. हेच कारण आहे की अनेक शेतीतज्ञ आता शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करण्याचा सल्ला देताहेत.
शेतकरी मित्रांनो, या लेखात आपण डायरेक्ट सिडींग टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान अर्थातच थेट पेरणी पद्धतीने भात शेती केल्यास शेतकऱ्यांना काय फायदे होऊ शकतात, या तंत्रज्ञानाच्या वापराची गरज काय? याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण पुढच्या लेखात थेट पेरणी पद्धतीने भात शेती करण्यासाठी शेतकऱ्यांपुढे काय आव्हाने आहेत, यासाठी कोणत्या यंत्रांची गरज भासते? थेट पेरणी पद्धतीने पेरणी केल्यास शेतकऱ्यांना किती बियाणे लागते? यासारख्या बारीक-सारीक गोष्टींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आजचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसमवेत अवश्य शेअर करा.