Organic Pesticide: देशात सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) शेतकऱ्यांचा (Farmer) कल वाढला आहे. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरू केला आहे.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन (Farmer Income) मिळाले मात्र रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनीचा कस मारला गेला, जमीन नापीक बनली परिणामी आता पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. विशेष म्हणजे मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती (Farming) करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.
यामुळे सर्वत्र सेंद्रिय खते, आणि सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर आता झपाट्याने वाढला असून आता शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करत आहेत. त्यामुळेच पिकांचे सकस उत्पादन होत असून रसायनांच्या वापरामुळे होणारे नुकसानही कमी होत आहे. मित्रांनो दरवर्षी पावसाळ्यात पिकांवर कीटक आणि रोग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
यावर्षी देखील पिकांवर कीटक आणि रोग-राईचे सावट कायम आहे. मात्र आता शेतकरी बांधव यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी चांगला सेंद्रिय पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत कडुनिंबाच्या कीटकनाशकांसोबतच, लेमन ग्रास कीटकनाशक पावसाच्या किडींविरूद्ध एक चांगली ढाल सिद्ध होत आहे.
पावसाच्या अळीसाठी लेमनग्रास कीटकनाशक
पावसाळी कीटक पिकाचे खूप नुकसान करतात, ते पिकांचा रस शोषून उत्पादनाची गुणवत्ता खराब करतात. अशा परिस्थितीत लेमन ग्रासपासून बनवलेल्या सेंद्रिय फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या तसेच बागायतदारांच्या अडचणी कमी होऊ शकतात.
हे कीटकनाशक बनवायला खूप सोपे आहे. जे लोक बागकाम करतात ते देखील हा स्प्रे बनवून आपल्या घरातील भाजीपाल्याला फवारू शकतात आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या उत्पादित करू शकतात.
हे तयार करण्यासाठी लेमन ग्रासची पाने पाणी घालून बारीक करा.
यानंतर गरजेनुसार बेकिंग सोडा, कडुलिंबाचे तेल किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड देखील मिसळले जाऊ शकते.
यापैकी कोणत्याही एका गोष्टीचे मिश्रण करून लेमन ग्रास कीटकनाशकाचे मिश्रण तयार करा आणि प्रति एकर गरजेनुसार पाणी घालून पिकावर फवारणी करा.
लक्षात ठेवा कीटकनाशकाची फवारणी हवामान स्वच्छ असेल तेव्हाच करावी.