Onion Rate Will Hike : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात कांद्याची लागवड नाशिकसहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांमध्ये केली जाते.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मात्र कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. परंतु, उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच कांदा बाजारभावातील लहरीपणाचा सामना करावा लागतोय. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजार भाव दबावात आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून बाजारभाव दबावात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही.
खरे तर निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार होती. पण, शासनाने 31 मार्चनंतर देखील निर्यात बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
किरकोळ बाजारातील किमती कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. पण सरकारच्या या निर्णयाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, सरकारने निर्यात बंदी वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही देशांना कांदा निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने आपल्या मित्र देशांना कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे.
निर्यातबंदीनंतर सरकारने बांगलादेशला 40 हजार टन, युएईला 24,400 टन, श्रीलंकेला १०,००० मेट्रिक टन, बहरीनला ३,००० टन, मॉरिशसला १२०० टन आणि भूतानला ५५० टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिलेली आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
काल अर्थातच 15 एप्रिल ला केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अधिसूचना जारी झाली आहे आणि या अधिसूचनेनुसार पुन्हा एकदा आपला देशला आणि युएईला प्रत्येकी दहा हजार टन अर्थातच वीस हजार टन कांदा निर्यात होणार आहे.
श्रीलंका आणि UAE मध्ये कांद्याची निर्यात करण्यासाठी विदेशी व्यापार महासंचालक (DGFT) ने 15 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे.
एनसीईएलच्या माध्यमातून कांदा निर्यात होणार आहे. म्हणजेच आत्तापर्यंत बांगलादेशला 50000 टन आणि यूएई ला 34,400 टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे.