Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर टिकून आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर एकदाही कांदा बाजार भावावर दबाव आला नाही. नाफेडने खुल्या बाजारात कांदा विक्री सुरू केल्यानंतरही कांद्याचे दर तेजीत आहेत हे विशेष. यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळत आहे.
खरे तर शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या आधी गेली अनेक महिने कवडीमोल दरात कांदा विकला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना पीक उत्पादित करण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा खर्च देखील भरून काढता आला नाही.
म्हणून अनेक कांदा उत्पादक अक्षरशः कर्जबाजारी झालेत. मात्र आता परिस्थिती पलटली आहे. बळीराजाच्या कष्टाला अन त्यांच्या घामाला आता योग्य मोल मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
आज राज्यातील दोन बाजारांमध्ये कांद्याला तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. यामुळे आगामी काळात कांदा बाजार भाव 7000 चा टप्पा गाठणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कांदा बाजार भावाने 7000 चा टप्पा गाठला पाहिजे अशी शेतकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे. दरम्यान बाजार अभ्यासकांनी जोपर्यंत नवीन कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत कांदा बाजारात तेजीची शक्यता वर्तवली आहे. नक्कीच ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
यामुळे कांदा बाजार भावात आणखी वाढ होणार या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला सर्वाधिक दर मिळाला याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक दर?
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : विदर्भातील या बाजारात आज कांद्याला किमान 3750, कमाल 6000 आणि सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : अमरावती हे विदर्भातील एक प्रमुख मार्केट. या ठिकाणी विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. दरम्यान विदर्भातील याच बाजारात आज कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. येथे आज कांद्याला किमान 3000, कमाल 6000 आणि सरासरी 4000 असा दर मिळाला आहे.