Onion Rate : गेल्या चार महिन्यांच्या काळात भारतातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सरकारने घाईघाईने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र कांदा निर्यात सुरू करतानाच सरकारने किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लागू केली.
यामुळे कांदा निर्यात सुरू झाली असली तरी अप्रत्यक्षपणे कांदा निर्यात बंदी कायमच आहे असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे कांदा निर्यातीसाठी लागू असणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे.
बाजारात सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे मात्र कांदा निर्यात बंदी साठी लागू असणाऱ्या जाचक अटी काढल्या गेल्या तर बाजारभावात आणखी सुधारणा होणार आहे. यामुळे याचा सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्याकरता राहणार आहे. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 3,100 आणि सरासरी 2500 रुपये असा भाव मिळाला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2 हजार , कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये कांद्याला किमान 1100, कमाल 3250 आणि सरासरी 2700 असा दर मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200, कमाल 3000 आणि सरासरी 2100 असा भाव मिळाला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2500, कमाल 3000 आणि सरासरी 2800 असा दर मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 3000 आणि सरासरी 2250 असा दर मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3100 आणि सरासरी 2250 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1400, कमाल 2809 आणि सरासरी 2750 असा दर मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.