Onion Rate : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा मुद्दा चर्चेस आला आहे. जेव्हापासून अफगाणिस्तानचा कांदा काही खाजगी व्यापाऱ्यांनी पाकिस्तान मार्गे भारतात आयात केला असल्याचे वृत्त समोर आले आहे तेव्हापासून कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा गरम होऊ लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि अमृतसर येथील काही खाजगी व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान मध्ये कांदा बाजार भाव कमी झाले असल्याने तेथून काही ट्रक कांदा आयात केली आहे. मात्र काही जाणकार लोकांनी अफगाणिस्तान मधून आयात झालेला कांदा हा खूपच कमी असून याचा विनाकारण बोभाटा केला जात आहे.
काही व्यापारी लोक अफगाणिस्तान मधून कांदा आयात झाला असल्याचे कारण पुढे करून बाजारभाव कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याची भीती देखील काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा या परिस्थितीत आज आपण राज्यातील बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील बाजारांमधील उन्हाळी कांदा बाजारभाव
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 4000, कमाल 4200 आणि सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1300, कमाल 3222 आणि सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला कमाल 2898 किमान, एक हजार आठ आणि सरासरी 2700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1300, कमाल 2990 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : संगमनेरच्या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 400, कमाल 3251 आणि सरासरी 1826 असा दर मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3250 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2900 आणि सरासरी 2775 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती : सिन्नर एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 2831 आणि सरासरी 2700 असा दर मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : मुंगसे एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान शंभर, कमाल 2895 आणि सरासरी 2700 असा दर मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3000 आणि सरासरी 2800 असा भाव मिळाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 450, कमाल 2839 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.