Onion Rate : लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना किंवा आणणारा कांदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला बाजारात फारच कवडीमोल दर मिळाला आणि यामुळे सत्ताधाऱ्यांना ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते अशा मतदारसंघांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
तोच कांदा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे या चर्चांना अधिकचं उधाण आले आहे. नाफेड खुल्या बाजारात बफर स्टॉक मधील कांदा विक्रीसाठी दाखल करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच नाफेड कडून खुल्या बाजारात बफर स्टॉक मधील कांदा विक्रीसाठी उतरवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सहाजिकच कांद्याची उपलब्धता वाढून बाजार भाव घसरण्याची भीती आहे.
दरम्यान नाफेड बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवणार अशा चर्चा असताना महाराष्ट्रात कांद्याला काय दर मिळतोय याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
उन्हाळी कांद्याला काय दर मिळतोय ?
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3860 अन सरासरी 3450 असा भाव मिळाला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3611 अन सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1201, कमाल 3751 आणि सरासरी 3400 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2 हजार, कमाल कमाल 3740 अन सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1 हजार, कमाल 3696 अन सरासरी 3450 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1600, कमाल 3542 अन सरासरी 3460 असा भाव मिळाला आहे.