Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळाली. मात्र तदनंतर बाजारभाव थोडेसे नरमलेत. तथापि अजूनही राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला समाधानकारक असा भाव मिळत असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरे तर लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांनी अगदी कवडीमोल दरात कांद्याची विक्री केली आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता बाजारभावात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तथापि केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीसाठी जाचक अटी लावून दिल्या आहेत त्या जर मागे घेतल्या गेल्या तर बाजार भावात आणखी वाढ होणार आहे.
यामुळे या अटी सरकारने लवकरात लवकर मागे घेतल्या पाहिजेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोर धरत आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य अर्थातच महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण होऊ शकते अशी शक्यता आहे.
जर समजा सरकारने हा निर्णय घेतला तर नक्कीच यामुळे कांदा बाजारभावात सुधारणा होणार असे मत तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात कांद्याला काय भाव मिळतोय
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : कोल्हापूरच्या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 3300 आणि सरासरी 2300 असा दर मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : मराठवाड्यातील या प्रमुख बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 2800 आणि सरासरी 1900 असा भाव मिळाला आहे.
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. आजच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 4250 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : सोलापूरच्या या बाजारात आज लाल कांद्याला किमान 400, कमाल 3100 आणि सरासरी 2450 असा भाव मिळाला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याला किमान 1400, कमाल 2700 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी 1900 असा भाव मिळाला आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याची सर्वाधिक आवक झाली. आजच्या लिलावात अहमदनगर एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 2900 आणि सरासरी 2300 असा भाव मिळाला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1100, कमाल 2901 आणि सरासरी 2450 असा भाव मिळाला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2800 आणि सरासरी 2680 असा भाव मिळाला.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 2900 आणि सरासरी 2300 असा भाव मिळाला.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2821 आणि सरासरी 2675 असा भाव मिळाला.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1300, कमाल 2790 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3001 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला.