Onion Rate : काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल 7,100 रुपये प्रति क्विंटल असा कमाल विक्रमी दर मिळाला होता. खरेतर दिवाळीनंतर राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे दिवाळीनंतर बाजार भावात ही सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला कमाल 6,600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 6,600 आणि सरासरी 3000 असा दर मिळाला आहे. आता आपण राज्यातील काही इतर प्रमुख बाजारांमधील बाजार भाव अगदी थोडक्यात जाणून घेऊया.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान सतराशे, कमाल 4295 आणि सरासरी चार हजार असा दर मिळाला.तसेच उन्हाळी कांद्याला किमान 3951, कमाल 5500 आणि सरासरी 5370 असा भाव मिळाला.
सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 5651, कमाल सहा हजार तीनशे आणि सरासरी सहा हजाराचा भाव मिळाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 3,100, कमाल 6195 आणि सरासरी 5550 रुपये मिळाला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2151, कमाल 5700 आणि सरासरी 5300 असा दर मिळाला.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 5,661 आणि सरासरी 5125 असा भाव मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2200, कमाल 6200 आणि सरासरी 3700 असा भाव मिळाला.
सांगली फळे भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 6000 आणि सरासरी 3500 असा दर मिळाला.