Onion Rate : कांदा बाजारभाव गेल्या अनेक दिवसांपासून दबावात आहेत. सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता जवळपास सर्वच एपीएमसीमध्ये लाल तसेच उन्हाळी कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
आज झालेल्या लिलावात राज्यातील पिंपळगाव एपीएमसी सोडून इतर प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला 700 रुपये प्रतिक्विंटल पासून ते 1616 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
पिंपळगाव एपीएमसीमध्ये मात्र पावसाळी पोळ कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी तर मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाले आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज तीन हजार 906 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये नमूद झाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 25 हजार 963 लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2650 रुपये एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2220 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3245 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 2400 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1370 रुपये एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेसातशे रुपये नमूद झाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज पंधराशे क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावा ते एपीएमसी मध्ये कांद्याला दीडशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1099 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 800 रुपये नमूद झाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 3795 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज आलेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून १५९१ रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 2000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1021 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव सातशे रुपये नमूद झाला आहे.